लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या पोटात गोळा हा येतोच.पण ते जेवढं आनंदाच तेवढच नंतर त्रास दायकही अन मजेशीर गोष्ट पण असते. हुशारीने समजूतदार पणाने निभावलं तर आनंद नाही तर ….असो पण ह्या सार्या आनंददायी गोष्टीत काही गोष्टी अशाही असतात ज्या हल्ली जास्त वाढत जात आहेत. मुलीच्या वडीलांना वाटत मुलगी सुखी असावी तर मुलाच्या बाजूनही अशाच गोष्टी असतात सुन स्वभावाने चांगली असावी समजूतदार असावी. पण असो सारं काही मिळणं कुणाच्याही नशीबात नसत. किंवा ते मिळालंही तरी नंतर कुठे ना कुठे कमी ही असतेच कारण प्रत्येक माणूस हा कधीच परीपुर्ण नसतो.लेखातही अशाच काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय पण यासार्या गोष्टी तुम्ही अनुभवी लोक समजून घ्याल काही चूकीच लिहीलं गेल्यास माफ कराल.
– वीरेंद्र सोनवणे
Leave a Review