मनातला पाऊस…
मनातल्या पावसाची झिम्मड
अधूनमधून बरसत राहते
अल्लड सुरांच्या तालावर
विरहाची अग्नी चेतवते…
घन येती गरजत बरसत
हुरहुर मनाची वाढते
पडता पावसाचे थेंब ओठांवर
स्वप्न मिलनाचे गुंफते…
पावसाशी आपले नाते
फारच अतूट आहे रे
वीज कडाडता उरात
आठवांचं चांदणं पडतं रे…
रूप मनोहारी पावसाचे
सावळे नभ बावरे
सुखाचा सोबती पर्जन्या तू
दुःखातही माझा सांगाती रे…
Leave a Review