भामटा ज्योतिषी

एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एक रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा .दररोज तो समोर जन्मकुंडल्या घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा .लोकही त्याला आपले भविष्य विचारत.मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा .अशा प्रकारे त्याने अमाप धनदौलत कमावली.

एके दिवशी तो लोकांचे भविष्य सांगण्यात गुंतला असताना एक व्यक्ती त्याच्याकडे पळत-पळत येतो आणि म्हणतो की , त्याच्या घरामध्ये चोरी झाली आहे . त्यावर तो आपल्या घराकडे जात असताना मध्येच त्याला एक व्यक्ती अडवतो आणि अशाप्रकारे धावण्याचे कारण विचारतो..यावर तो ज्योतिषी स्वत:च्या घरी चोरी झाल्याचे सांगतो .यावर तो व्यक्ती म्हणतो ,ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे की, जो व्यक्ती दुसऱ्या लोकांचे दुर्भाग्य ओळखतो . त्याला स्वत:च्या दुर्भाग्याबद्दल माहित नाही. यावर तो ज्योतिषी शरमेने मन खाली घालतो आपला घमंडी ,भामटेपणा लोकांसमोर व्यक्त करत असतो.