प्रेम कविता

मैत्री कशी हळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दुःख वाहून जाते
व्यथांनाही हसू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

तूच किनारातूच वारा डोई आसमंत निळा भोवताली तुझीच छाया

टिक टिक घड्याळाची करिते क्षणांस जाचक, होत नाही महन ते एकटेपण, आठवणींच्या दुनियेत रमून, होते भूतकाळाचे चित्रीकरण नयन मिटताच ते रूप तुझे, तो सहवास तुझा,ते दुःख तुझे, ती काळजी तुझी, जणू भासते ती व्हावी आत्ताच परिधान,पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो थेंबांचा प्रवाह नयन उघडताच

तो वारा नदी काठचा अजूनही शहारे आणून देतो गोड आठवणी जुन्या परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या…. इतका पण हळवा नव्हतो मी कधी

मनाच्या खोल कुठेतरी विचारांचं खळबळ माजलयं विरहाचं धुकं नात्यात दाटलयं अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी तुला दिलेल्या एका वचना पायी गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.

माझ्या प्रेमाच्या फुलाला आधार तुझा हवा नेमका प्रेमाचा अर्थ जगाला तुझ्यामुळेच कळाला.

तुझी मिठी म्हणजे चंद्र चांदण्यांचा भास मिलन ह्रदयाचा व्हावं एकत्र येऊन तुझा-माझा श्वास

शृंगार तुझा असापाहून तो चंद्र ही लाजेल अपूर्ण सौंदर्य त्याचं तो तुझ्यात शोधेल.

तू आहेस सोबत म्हणूनचशब्द बोलत आहेतअबोल्याचे क्षण त्यांनीकित्येक दिवस पाहिले आहेत.

कोरे ठेऊन पान मनाचे आठवणीत का बोलतेस बंद दरवाजे मिलनाचे स्वप्नातच का भेटतेस