साहित्य:
पिझा ब्रेड साठी :
१) २५० ग्राम मैदा,
२) १० ग्राम खमीर,
३) १ छोटा चमचा साखर,
४) ४ लहान चमचे तूप,
५) १/२ छोटा चमचा मीठ
मसाल्यासाठी :
१) १/२ किलो टोमेटो,
२) २ कांदे,
३) ४ काळी लसून,
४) १ तुकडा आले,
५) १ ढोबळी मिरची,
६) १ कप बारीक चिरलेली पत्ता कोबी,
७) मीठ चवीनुसार,
७) १/२ चमचा लाल मिरची पावडर,
८) १/४ लहान चमचा गरम मसाला ,
९) १ लहान चमचा साखर,
१०) १ लहान चमचा कोर्नफ्लोवेर,
११) १०० ग्राम चीज
कृती:
१) मैद्यात मीठ साखर व खमीर टाका व तूप आणि पाणी टाकून माळून घ्या.
२) अर्धा तास ठेवल्यानंतर त्याचे ४ लहान गोळे तयार करा १० मिनिट १-१ करून चारी पोळ्या भाजून घ्या
३) टोमेटो,कांदा,आल,लसूण बारीक चिरून एका कढईत टाकून भाजून घ्या.
४) पूर्ण पाणी शिजल्यावर लाल मिरची पावडर ,साखर,मीठ,व गरम मसाला टाका.
५) एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्याच्यात कोर्नफ्लोवेर, टाका.हे मिश्रन ग्यासवारील टोमेटोच्या मिश्रणात टाका.
६) मिश्रण जाडसर झाल्यावर त्याच्यात ढोवली मिरची व गाजर बारीक चिरून टाका.
७) २ मिनिटे भाजून ग्यास बंद करा.
८) आता पिझा बेसवर हे मिश्रण पसरून त्याच्यावर चीज किसा.
९) हि ब्रेड ओव्हन मध्ये १५०’० ला ७ ते ८ मिनिटे ठेवा टोमेटो सॉस टाका.
१०) खाण्याच्या सोयीकरिता चाकूने चिरून लहान लहान तुकडे करा.
Leave a Review