पनीर सॅन्डविच

साहित्य :-

  1. सव्वाशे ग्रॅम पनीर
  2. दोन मोठे चमचे घट्ट चक्का
  3. दोन-तीन हिरव्या मिरच्या
  4. पाव वाटी बारीक चिरलेला कांदा
  5. पाव वाटी बारीक चिरलेली काकडी
  6. पाव वाटी बारीक चिरलेला टोमाटो
  7. थोडी चिरलेली कोथिंबीर
  8. दोन मोठे चमचे टोमाटो सॉस
  9. ब्रेडचे स्लाईस आणि लोणी
  10. चवीनुसार मीठ .

कृती :-

  1. पनीर , चक्का , मीठ , मिरची आणि टोमाटो सॉस एकत्र करून मिक्सरमधून काढावं .
  2. त्यात चिरलेला कांदा , काकडी , टोमाटो आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिसळावं .
  3. ब्रेडच्या स्लाईसवर हे मिश्रण लावून त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवावी आणि सॅन्डविच तयार करून ते लोणी लावून भाजावं .