अष्टविनायकापैकी चिंतामणी गणेशाचे देवस्थान येथे आहे.कर्तबगार माधवराव पेशवे यांचे ते श्रद्धा स्थान होय .हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. अंत:काळ जवळ आला असे वाटू लागताच ते पुण्याहून येथे आले .मंदिराशेजारी पेशव्यांचा वाडा होता .(आता फक्त चार भिंती शिल्लक आहेत .) गावही फार लहान आहे .शेवटचे काही दिवस माधवराव मंदिरातच राहत असत व सभामंडपात काही काळ गणेशाच्या मूर्तीसमोर राहत असत . तेथेच त्यांचा अंत झाला . त्यांची पत्नी रमा सती गेली .मंदिरापासून जवळच असलेल्या नदीकाठी त्यांचा अंत्यविधी करण्यात आला .सतीचे वृंदावन तेथे आहे .(आता तेथे साफसफाई करून जागा स्वच्छ केली आहे सन २००० पर्यंत नव्हती . सर्वत्र कचरा व घाण होती) मंदिरात सुद्धा माधवरावांचे स्मारक नगण्य परिस्थितीत होते ते पण आता जरा मोठ्या जागेत ठीकपणे केले आहे .मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.
मार्ग : – श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे . लोणी गावापासून फक्त 7 कि.मी. अंतरावर आहे . पुण्याहून येथे यायला बससेवा आहे व चांगला रस्ता आहे .बस सारसबागेपासून सुटते .
Leave a Review