चांदोबाचे ससे

एक जंगल् होते .या जंगलात हत्ती राहत होते . जंगलात पाण्याने भरलेले अनेक तलाव आणि सरोवरे होती. त्यामुळे हत्ती अंघोळ करतांना पाण्यत दुब्ण्याचा मनमुराद आनंद लुटायचे .सोंडेमध्ये पाणी भरून त्याचा ‘फुर्र्रर्र’ करून फवारा एकमेकांच्या अंगावर सोडतानासुद्धा त्यांना खूप मजा वाटायची .पण ही मजा अधिक काळ टिकली नाही .
एकदा एका वर्षा ऋतूमध्ये पाऊसच पडला नाही .त्यानंतर आला हिवाळा आणि उन्हाळा .
तलावांतील आणि सरोवरांमधील पाणी हळूहळू कमी होत गेले .उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडू लागले .त्यामुळे उन्हाळ्याच्या मध्यावधीत तलाव आणि सरोवरे आटून पूर्णपणे कोराडी पडली .हत्तींना तर पाण्यात बुडण्याची सवय झाली होती त्यामुळे पाण्याशिवाय राहणे ही कल्पना त्यांना असह्य वाटत होती .
अखेरीस सर्व हत्तींनी ते जंगल सोडून जाण्याचा निर्णय घेतला .हत्तींचा राजा म्हणाला,”जिथं पाण्याने भरलेली सरोवरे असतील ,असं दुसरे जंगल आपण शोधून काढूया .चला ,चला ,लवकर लवकर चला ,”
हत्तींचा कळप ते जंगल सोडून निघाला .हत्तींची त्या कळपातील २-४ पिल्ले तर चालता चालता थकून गेली .इतक्यात त्यांना दूरवर एक सरोवर दिसले .त्या सरोवरातील पाणी उन्हामुळे चमकत होते .त्यावर चमचम असे तरंग उठत होते .ते पाहताच सर्व हत्तींना मनस्वी आनंद झाला .सर्व हत्तींनी सोंड वर करून सरोवराच्या दिशेने धावले .आणि ते पाण्यामध्ये धबाक…..धबाक…करून डुबू लागले ….मनसोक्त नाचू लागले आणि त्यांनी खुप आनंद लुटला .
मग तो हत्तींचा कळप परतला .त्या सरोवराच्या किनारी खूप सारे ससे राहत होते .मोठ्या लांब लांब कानांचे दुधासारखे पांढरेशुभ्र ! हत्तींच्या या धावपळीमध्ये बिचाऱ्या सशांची अवस्था खूपच वाईट झाली .
ससे आपला जीव वाचविण्यासाठी इकडे -तिकडे सैर-वैर पळू लागले .त्यांची खूपच तारांबळ उडाली तरीसुद्धा काही ससे हत्तींच्या पायाखाली चिरडले गेले आणि मरण पावले. अनेक जण रक्त बंबाळ झाले .सशांमध्ये मोठी खळबळ उडाली .सर्व ससे घाबरले.सरोवरात पाणी राहिल्यामुळे सर्वच हत्ती येथे रोजच येतील .दररोज कितीतरी ससे त्यांच्या पायाखाली चिरडले जातील आणि मारतील आमच्या वंशाचा सर्वनाश होईल ,अशी चिंता त्यांना वाटू लागली .
यावर काहीतरी उपाय शोधून काढण्यासाठी सर्व सशांनी एक सभा भरवली .
त्या सभेत एका सशाची घाबरट मादी म्हणाली ”आपल्याला आता ही जागा सोडून लगेच दुसऱ्या कोणत्या तरी जागी निघून गेलं पाहिजे .”
अनेकांनी सुद्धा तिच्या म्हणण्याचे समर्थन केले .पण काही सशांनी विरोध केला.,”आमचे आईवडील आणि पूर्वज येथेच राहत होते .ही आपली मातृभूमी आहे; म्हणून संकट आल्यावर स्वदेश सोडून जाणे ,हे ठीक नाही .”

तेव्हा एक म्हातारा ससा म्हणाला ,”आपण हत्तींना घाबरवल पाहिजे जर का एखाद्या उपायाने हत्ती घाबरले ,तर ते लगेच ही जागा सोडून नक्कीच निघून जातील.”
”पण डोंगराएवढ्या मोठ्या हत्तींना आपण कसं काय घाबरवणार?” एका सशाने विचारले .
म्हातारा ससा म्हणाला ,” चांदोबाची भीती दाखवून आपण हत्तींना घाबरवल पाहिजे .”
त्या सशाने पुन्हा विचारले ,”पण आपण चांदोबाला धरतीवर आणणार कुठून ?”म्हातारा ससा म्हणाला ,”चांदोबाला धरतीवर आणण्याची गरजच नाही .श्रीरामाच्या केवळ नामानेच शिळा तरल्या नव्हत्या का?” त्यांनतर म्हाताऱ्या सशाने इतर सर्व सशांना संपूर्ण योजना समजावून सांगितली .
लंबकर्ण नावाच्या एका सशाला चंद्राचे दूत बनवण्यात आले आणि त्याला उंच टेकडीच्या माथ्यावर पाठवण्यात आले . ती पौर्णिमेची रात्र होती . गोल गरगरीत चांदोबा आकाशात उठून दिसत होता .संपूर्ण परिसर शीतल चंदेरी प्रकाशात न्हावून निघाला होता . लंबकर्ण टेकडीच्या माथ्यावर हत्तींच्या कळपाची वाट पाहत बसला होता . इतक्यात हत्तींचा कळप त्या दिशेने येताना त्याला दिसला .हत्तींच्या कळपाचा राजा सर्वात पुढे चालत होता. लंबकर्णने मोठ्याने साद दिली ,” हत्तीराजे अहो हत्तीराजे….”
हत्तीने आजूबाजूला पहिले .पण त्याला कोणीही दिसले नाही .मग त्याने वर पहिले तर टेकडीवर एखाद्या चांदणीसारखा एक पांढराशुभ्र ससा त्याला दिसला .
हत्तीने विचारले ,”अरे असा का ओरडतो आहेस ?काय काम आहे ?”
ससा म्हणाला ,”गजराज ,मी चांदोबाचा दूत आहे .मला चांदोबाने पाठवलं आहे .चांदोबा तुम्हा सर्वांवर खूप नाराज आहे.”
हत्ती आश्चर्याने म्हणाला ,”चंद्र आणि आम्हा सर्वांवर नाराज झाला आहे ! पण त्याच कारण तरी सांग .आमचा काही दोष -अपराध ?”
ससा आता रुबाबात म्हनला ,”तुमचा केवळ दोष नाही ,तर तुम्ही पाप केले आहे ,पाप !”
”कसलं पाप?” हत्तींच्या राजाने विचारले .
ससा म्हनला ,;;काळ दुपारी तुम्ही सर्वांनी सरोवरात स्नान केल होत .या किनारी चांदोबाचे ससे राहतात .त्यांच्यापैकी कितीतरी ससे तुम्ही चिरडून टाकले आहे.चांदबाने हे सरोवर आम्हा सशांनाच सोपवले आहे अन्य कोणालाही येथे येण्याचा अधिकार नाही ,”
”तू काय म्हणतोस ते मला अजिबात कळत नाही . तू सांगतोयस त्याचा पुरावा तरी काय ?” हत्तीने विचारले .
ससा म्हणाला ,”तर चला ,माझ्या मागोमाग सरोवराच्या किनारी .तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की,चांदोबा तुम्हा सर्वांवर किती कोपला आहे !”
ससा आणि हत्तींच्या कळपाचा राजा सरोवराच्या किनारी पोचले .इतर सर्व हत्ती त्यांच्या पाठोपाठ येऊ लागले .
हत्तींच्या पायांचा आवाज ऐकून तेथील आसपासचेबेडूक घाबरले आणि त्यांनी सरोवराच्या पाण्यात ‘धबाक…..धबाक….’ अशा उड्या मारल्या .
त्याबरोबर पाण्यावर तरंग उठले .त्यामुळे पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब हलु लागले. ससा ते हलणारे प्रतिबिंब दाखवत म्हणाला ,” बघा आपल्या डोळ्यांनीच बघा. चांदोबाचे तोंड कसे रागाने थरथरत आहे !”
हे पाहून हत्तींचा राजा घाबरला . त्याला सशाचे म्हणणे खरे वाटू लागले . ससा पुढे म्हणाला ,” तुम्ही चांदोबाला नमस्कार करून त्याची माफी मागा ; म्हणजे मग त्यांचा राग शांत होईल .” हत्तीने हात जोडून आणि मान खाली घालून चंद्राची माफी मागितली .पाण्यावर तरंग उठ्याचे थांबल्यावर,चंद्राचे प्रतिबिंबही स्थिर झाले .ससा गजराजाला म्हणाला ,”बघा, आता चांदोबा शांत झाला आहे .जर तो पुन्हा क्रोधीत झाला ना तर तुमची खैर नाही .म्हणून तुम्ही सर्व जन आताच्या आता या क्षणीच हे सरोवर सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जाव.”
हत्तीने पुन्हा एकदा चंद्राला प्रणाम केला आणि नंतर इतर सर्व हत्तींसह ते सरोवर सोडून दूर निघून गेले . दुधासारखे पांढरेशुभ्र ससे अत्यंत आनंदित होऊन चांदण्यांमध्ये नाचू बागडू लागले .